प्रवासातील अनुभव भाग 15 यवतमाळ मध्ये या चौकातून त्या चौकात जायचे असेल तरीही मोजा 50 रुपये !

 *प्रवासातील अनुभव...*



( भाग : 15 ) 

बुधवार दि. 23 एप्रिल 2025 रोजीचा अनुभव...

... यवतमाळात या चौकातून त्या चौकात जायचं असेल तरीही मोजा ₹50 रुपये ! 

👉 आज मला कामानिमित्त यवतमाळ ला जायचे होते. उन्हाचे दिवस असल्यामुळे  सकाळी लवकरच मी घराबाहेर पडलो. कडाक्याचे ऊन पाहता साहजिकच बसले प्रवास सुरू केला.  

 वाशिम - अमरावती गाडीने थेट  कारंजा लाड गाठले. तेथून यवतमाळ कडे जाणाऱ्या गाडीने दारव्हा येथे उतरलो. 

 तेथील काम एक ते दीड तासात आटोपले. नंतर बसनेच यवतमाळ पोचलो. 

यवतमाळ बस स्टॅन्ड चे नूतनीकरण काम बऱ्याच दिवसांपासून सुरू होते. आता ते पूर्णही झाले आणि बस सुद्धा तेथून सुटत आहेत. हे दृश्य पाहून आनंद वाटला. 

 बस स्टँडच्या बाहेर आलो. येथून दाते कॉलेज चौक येथे जायचे होते. फार जास्त अंतर नव्हते मात्र, कडाक्याचे ऊन असल्यामुळे 

 ऑटो पकडला, त्या ऑटोवाल्याने पन्नास रुपयेच लागतील. त्यापेक्षा कमी घेणारा ऑटोवाला तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. असे जणू काही अभिमानाने तो ऑटोवाला सांगत होता. मलाही अर्जंट असल्यामुळे ऑटोत बसलो, अन काही क्षणात दाते चौक आला.  पन्नास रुपये त्याच्या हातावर ठेवले. 

 साधारणतः दोन तासात तेथील काम आटोपले. 

 तेथून कळंब चौक येथे जायचे होते,  तेथेच उभ्या असलेल्या ऑटो वाल्याला विचारले तर  पन्नास रुपयांच्या कमी घेणार नाही, मग सवारी एक असो की जास्त असो , असे ऐटीच्या आवाजात त्याने सांगितले. 

 ऑटोत बसलो आणि उतरल्यानंतर त्यालाही पन्नास रुपये दिले . 

कळंब चौकात काही ठराविक काम झाले नाही. तेथे सुंदरशी लस्सी घेतली. पाणी पिले. 

 तेथून  मला मुख्य मार्केटमध्ये जायचे होते. त्यामुळे तिथे एका उभ्या असलेल्या ऑटो वाल्या जवळ गेलो. 

 त्याला विचारले, इलेक्ट्रिकल मार्केट लाईन   मध्ये जायचे आहे. किती घेणार? आधीच्या दोन-तीन वेळेस च्या ऑटो वाल्यांचा अनुभव बघता  हा सुद्धा 50 च्या कमी घेणार नाही याची मला जाणीव झाली होती. अन झालेही तसेच, त्याला विचारले असता, साहेब साठ रुपये होते लेकिन आपसे पचास रुपये लेता हु. 

  कडाक्याचे ऊन असल्यामुळे  आणि बसेसचा विचार करता परतीच्या प्रवासाला लागायचे असल्यामुळे त्यालाही पन्नास रुपये देण्यासाठी तयार झालो. 

  एक्झॅक्ट मला जिथे जायचे होते ती मार्केट गल्ली माहीत नव्हती, परंतु त्याला निशाणी सांगितली होती. मात्र त्याने स्वतःची काहीही बुद्धी न वापरता  एका  ठिकाणी नेऊन ऑटो थांबविला. आणि अब बोलो किधर जाने का, असे म्हणू लागला, 

 मोठे मार्केट आणि सारख्या सारख्या गल्ल्या असल्यामुळे कोणाचेही कन्फ्युजन होणारच. 

 बऱ्याच दिवसानंतर मी त्या ठिकाणी जात होतो. त्यामुळे अचूक गल्ली निवडणे कठीण जात होते.  शेवटी मीच अंदाज घेत घेत  त्या प्रतिष्ठान वर पोहोचलो, उतरल्यानंतर ऑटोवाला म्हणाला, साब अब पचास पे काम नही चलेगा,  100  रुपये लगेगा. आपने बहुत घुमाया है, 

 वाद-विवाद नको म्हणून, आणि वेळेची  कमी असल्यामुळे त्याला 90 रुपये दिले, तो निघून गेला. 

 नियोजित काम झाले, 

 पुन्हा तेथून बस स्टैंड वर जायचे होते. बाजूच्या एका चौकाच्या कॉर्नरला उभा राहिलो. मागून एक ऑटोवाला आला. 

 त्या ठिकाणाहून बस स्थानक  अर्धा किलोमीटर पेक्षाही कमी अंतरावर होते. मात्र,  आधीच्या  ऑटो वाल्यांचा अनुभव पाहता , हा सुद्धा पन्नास रुपयांच्या कमी घेणार नाही, हे माहित होतेच. ऑटोत बसल्यानंतर त्याला सहज विचारले, बस स्टॅन्ड चे किती घेणार? तर तोही अपेक्षित असलेलेच बोलला. 

साहेब पन्नास रुपये लागतील, 

  देणंच होते,  नाईलाज होता, ऑटोत बसलो आणि त्या ऑटो वाल्याला सरळ सरळ बोललो. ऑटोवाले साहेब,   आपल्या शहरात या चौकातून त्या चौकात जायचं असेल तरीही पन्नास रुपये घेतात. हे जास्त होत नाहीत का? 

 कारण आमच्या वाशिम मध्ये वीस रुपयात  दूरच्या चौकातही नेऊन सोडले जाते? वाशीम आणि यवतमाळ हे लागूनच असलेले जिल्हे. मग यवतमाळत एवढे ऑटो भाडे का असेल?  त्यानंतर मी त्या ऑटोवाल्याला अनेक प्रश्न विचारले. 

मी पत्रकार आहे, तुमच्या ऑटो वाल्यांच्या   विरोधात लिहिणार आहे. दोन मिनिटांच अंतर असल तरीही आपण पन्नास रुपये का घेता? असे अनेक प्रश्न त्याला विचारले, 

 यावर तो बोलला, साहेब सगळेच ऑटो वाले पन्नास रुपये घेतात, मी म्हटलं असा कसा नियम? पैसे काय झाडाला लागतात का? रोज मजुरी करून लोक पैसे कमावत असतात? आपण घ्या,  परंतु इतकेही घेऊ नका की  ग्राहकाचे कंबरडे मोडेल? 

 यावर तो बोलला साहेब,  सगळेच घेतात त्यामुळे मलाही घ्यावे लागते? 

 एवढे बोलता बोलता  बस स्थानक आले. ऑटोतून उतरलो, त्याला पन्नास रुपये दिले.

 हा ऑटो वाला थोडासा ज्येष्ठ व्यक्ती होता. त्यामुळे त्याला उद्धट बोलणे काही मला व्यवस्थित वाटले नाही. 

 पण तुमच्या या मनमानीच्या विरोधात मी लिहिणारच आहे. हे मी त्याला ठामपणे सांगितले. 

 यावर तो काहीही बोलला नाही...

  आज माझे यवतमाळ शहरात ऑटो भाड्यातच तीनशे रुपये गेले. 

  बस स्टॅन्ड वरून नागपूर मंगरूळपीर गाडीने मी  वाशिम कडे मार्गस्थ झालो...

 सध्या प्रवासातच आहे...

 सामान्य माणूस अत्यंत काटकसरीने पैसा खर्च करत असतो. मीही त्यातीलच एक. मात्र,  अशा प्रकारे  अनेक ठिकाणी नाईलाजाने  अतिरिक्त खर्च करावा लागतो. 

 खाजगी व्यावसायिक युनियन बनवून  आपले भाव ठरवत असतात. 

 ग्राहक मात्र यामध्ये नाहक भरडला जातो. 

 प्रत्येकच क्षेत्रात असे चित्र असते. 

यासाठी ग्राहक संघटनांची वज्रमुठ असायला पाहिजे. मात्र, ग्राहक संघटना नावापुरत्याच झळकत असतात. अशा एखाद्या अवाजवी  प्रकारावर त्या कधी आवाज उठवतील, याची काहीही शाश्वती नाही. 

 असल्या प्रकारांवर सामान्य माणसाने नक्कीच विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

 ( टिप : मी दैनंदिन कामानिमित्त दररोज कुठेतरी प्रवास करत असतो. प्रवासादरम्यान अनेक अनुभव मला येत असतात. यातील काही निवडक अनुभव शेअर करण्यासाठी मी *प्रवासातील अनुभव* हे सदर सोशल मीडियावर सुरू केले आहे . आजचा हा *पंधरावा* भाग आहे. हा अनुभव आपणास कसा वाटला हे आपल्या कमेंट च्या माध्यमातून जरूर कळवा. ) 

✍️ गजानन धामणे 

मुक्त पत्रकार,  वाशिम 

9881204538

Post a Comment

Previous Post Next Post